नेसरी / सी. एल. वृत्तसेवा
युवा प्रतिष्ठान मराठी सांस्कृतिक मंडळ शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) यांच्या वतीने ११ व्या दसरा महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे . गुरुवार दि ३ ऑक्टोबर 2024 या घटस्थापनेपासून हा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये शिप्पूर सारख्या छोटा गावामध्ये साजरा होणारा दसरा महोत्सव सर्वात मोठा उत्सव आहे.
या दसरा महोत्सवाची सुरुवात करणारे कै. प्रा. भैरु भालेकर यांनी या दसरा उत्सवाचा छोटसं रोपट लावलं आणि ह्या रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं आहे. या उत्सवाच्या माध्यमातून हिंदू संस्कृती टिकावी यासाठी या मंडळाच्या वतीने समाज प्रबोधनात्मक व विकासात्मक कार्यक्रम समाज जनजागृती आदि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या मंडळाच्या माध्यमातून गावच्या विकासाच्या कार्याला मोठ हातभार लावावा यासाठी गावातील अनेक जाणकार नेतेमंडळी त्याचबरोबर गावातील सामाजिक कार्य करणारी मंडळी यांनी मोलाचे सहकार्य केलेलं आहे .आज याच मंडळाच्या माध्यमातून गावचे भूषण असणारी श्री लक्ष्मी मंदिर समोरील दीपमाळ गावच्या वैभवात नक्कीच भर टाकत आहे ..तब्बल 3 लाख 50 हजार रुपये हा खर्च करून सुंदर अशी डोळ्यांचे पारणे फेडणारी ही दीपमाळ निर्माण करण्यात आली आहे.
दसरा महोत्सवामध्ये या दीपमाळे वरती दीपोत्सव प्रज्वलीत होणार आहे. या मंडळाचे अध्यक्ष अतुलराजे शिखरे ,उपाध्यक्ष विक्रम बोलके, कार्याध्यक्ष गोविंदा पाटील, सेक्रेटरी भरत सुफले, खजिनदार समीर पाटील त्याचबरोबर या मंडळावरती जीवापाड प्रेम करणारे या मंडळाची सर्व कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नातून ही दीपमाळ साकारत आहे. इथून पुढच्या काळात अनेक समाज उपयोगी कामे या मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहेत. हा दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठी गावातील सर्व महिला या दुर्गा मातेच्या आरतीसाठी नऊ दिवस उपस्थित राहून या मंडळाला सहकार्य करत असतात. त्याचबरोबर या मंडळासाठी लागणारा आर्थिक सहकार्य सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून मिळत असतो. 2023 हा दसरा महोत्सव अगदी थाटात साजरा झाला. यावर्षी हा उत्सव चांगल्या पद्धतीने संपन्न होणार आहे. या मंडळाच्या माध्यमातून ज्याने समाजासाठी काम केलेले आहे अशा थोर व्यक्तींचा गौरव शिप्पूर भूषण पुरस्कार व समाजभूषण पुरस्कार देऊन या मंडळाच्या वतीने करण्यात येतो. जेणेकरून शिप्पूर ग्रामस्थ जे मुंबईत राहून सुद्धा गावच्या सामाजिक कार्यात आर्थिक सहभाग दाखवतात, त्याच बरोबर मुंबईत मध्ये सुद्धा सामाजिक कार्य करतात अशा थोर व्यक्तींना शिप्पूर भूषण पुरस्काराने गौरवण्यात येते. जी व्यक्ती गावात राहून सुद्धा गावावरती जीवापाड प्रेम करून गावच्या सामाजिक कार्यात सहभाग घेते अशा व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. की या उद्देशाने या उत्सवात त्यांचा सन्मान केला जातो. सन 2024 चा दसरा महोत्सवाचा मंडप उभारण्याची सुरुवात गावचे सरपंच सचिन गुरव, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग भालेकर व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या शुभहस्ते पार पडला. अतिशय सुंदर असं डेकोरेशन त्याचबरोबर अत्यंत भावनिक असं वातावरण तयार करणारे या गावातील भजनी मंडळी या सर्वांचं युवा प्रतिष्ठान मराठी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले असून यावर्षी सुद्धा उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन युवा प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष अतुलराजे शिखरे यानी केले आहे.
No comments:
Post a Comment