चंदगड : खेडूत शिक्षण संकुलाच्या वतीने इनाम कोळींद्रे येथील अपघातग्रस्त रेणुका कुंदेकर यांना दिला मदतीचा हात - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2024

चंदगड : खेडूत शिक्षण संकुलाच्या वतीने इनाम कोळींद्रे येथील अपघातग्रस्त रेणुका कुंदेकर यांना दिला मदतीचा हात

अपघातग्रस्त गरीब महिला, रेणुका कुंदेकर यांना आर्थिक मदत करताना प्रा. आर. पी. पाटील, एन. डी. देवळे  व अन्य मान्यवर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     येथील खेडूत शिक्षण संकुलाच्या र. भा. माडखोलकर महाविद्यालय, न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेज, व दि. न्यू इंग्लिश स्कूल चंदगड यांच्या वतीने कोळंद्रे येथील अपघातग्रस्त गरीब व असाह्य  महिला कामगाराला नुकतीच आर्थिक मदत करण्यात आली.

      इ. कोळीद्रे येथील असाहाय्य व गरीब  महिला कामगार श्रीमती रेणुका  कुंदेकर  यांचा चंदगड येथील संभाजी चौकात अपघात झाला होता, त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने व त्यांना गडहिंग्लज  मध्ये तातडीने दाखल करावे लागणार असल्याने खेडूत  शिक्षण संकुलाच्या वतीने त्यांना आर्थिक मदत करण्यात आली.

     चंदगड येथील अनेक कुटुंबियांची  घरगुती कामे करणाऱ्या रेणुका कुंदेकर  यांच्या दोन्ही मुली खेडूत  शिक्षण संकुलात शिकतात, त्या दोन्हीही मुली दुपारनंतर दुकानात काम करून चरितार्थ चालवतात. अशा गरीब कुटुंबाला आधार द्यावा या सामाजिक बांधिलकीतून खेडूत  शिक्षण संकुलाने आर्थिक मदत केली.

     यावेळी खेडूतचे प्रा. आर. पी. पाटील, र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल, दि. न्यू. इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एन. डी. देवळे यांच्या हस्ते सदरची रक्कम देण्यात आली. यावेळी प्रा. एस. व्ही. गुरबे, टी. एस. चांदेकर, प्रा. बी. सी. शिंगाडे, प्रा. शाहू गावडे, प्रा. ए. डी. कांबळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment