राहुल पाटील मार्गदर्शन करताना. सोबत प्रा आर व्ही आजरेकर
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळ्या भाषेचा उपयोग करण्यात येतो. प्रत्येक भाषेमध्ये विशिष्ट अशी क्षमता असते त्यामुळे ही कौशल्य प्राप्त करून या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून घेता येतात. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लैंग्वेजचा अभ्यास करून व समाजाच्या समस्या लक्षात घेऊन सॉफ्टवेअर बनवावेत असे मत गडहिंग्लज येथील वन आयटी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीचे प्रमुख सागर पाटील यांनी व्यक्त केले.
ते चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
यावेळी सागर पाटील यांनी वेगवेगळे सॉफ्टवेअर व लँग्वेज यांच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली. प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनीही विद्यार्थ्यांनी अधिक जागरूक राहून आपल्या कौशल्याच्या जोरावर संगणक शास्त्राच्या माध्यमातून विविध उच्चपदे मिळवावीत असे आवाहन केले.
प्रास्ताविक सचिन गावडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय, संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर व्ही आजरेकर यांनी केला. आभार सुजय चांदेकर यांनी मांडले. या कार्यक्रमाला ए. पी. गवस, प्रा. विशाल पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment