डॉ. विठोबा लक्ष्मण पाटील |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
जागतिक संशोधकांच्या यादीत कालकुंद्री (ता. चंदगड) येथील डॉ. विठोबा लक्ष्मण पाटील यांना स्थान मिळाले आहे. अधिकाऱ्यांचा गाव म्हणून जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या कालकुंद्री येथील जागतिक स्तरावर शास्त्रज्ञ म्हणून निवड होण्याची पहिलीच घटना ठरली आहे.
अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जागतिक पातळीवरील आघाडीच्या संशोधकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. जागतिक स्तरावरील उदयोन्मुख शास्त्रज्ञांपैकी अव्वल दोन टक्के शास्त्रज्ञांची यात निवड केली जाते. यामध्ये कालकुंद्री येथील एका आमचे शिक्षणाचा कोणताच वारसा नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील डॉ. विठोबा पाटील यांनी हे अभूतपूर्व यश मिळवले आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयामध्ये Ph.D. पदवी प्राप्त केली आहे. आतापर्यंत त्यांनी एकूण ८० संशोधन पत्रिका आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केल्या आहेत व अजूनही त्यांचे संशोधन चालूच आहे. त्यांना शिवाजी विद्यापीठचे प्रभारी कुलगुरू प्रा. प्र. शं. पाटील तसेच भौतिकशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे या यशाबद्दल चंदगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्हा व महाराष्ट्रात कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment