अर्जुनवाडी फाट्यावरील दिशादर्शक फलकांची मोडतोड, अज्ञाताची हरामखोरी...,! कारवाईची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2024

अर्जुनवाडी फाट्यावरील दिशादर्शक फलकांची मोडतोड, अज्ञाताची हरामखोरी...,! कारवाईची मागणी

अर्जुनवाडी (ता . गडहिंग्लज ) फाट्यावरीत दिशादर्शक फलकांची करण्यात आलेली मोडतोड.
तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील फाट्यावर उभारलेले दिशा व अंतर दर्शक फलकांची अज्ञाता कडून तोडफोड करण्यात आली आहे. हरामखोरी करणाऱ्या समाजकंटकांना शोधून पोलिसांनी अद्दल घडवावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य मार्ग क्र 189 गारगोटी ते तिलारी या मार्गावर अर्जुनवाडी (ता गडहिंग्लज ) येथे उभारण्यात आलेल्या दिशादर्शक व अंतर दर्शक फलकांची अज्ञाताकडून मोडतोड करण्यात आली आहे .
   या राज्य मार्गावर ठिकठिकाणी दिशा दर्शक, अंतर दर्शक , गावांची नावे, गतीरोधक आदी माहितींचे फलक लावण्यात आले आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनोळखी वाहन धारकाला रात्रीच्या व दिवसाच्या वेळी या फलकांचा खूप उपयोग होत होता. पण मागील काही दिवसा मध्ये अर्जुनवाडी फाट्यावरील असणाऱ्या चार फलकांची जेसीबी च्या साह्याने मोडतोड झाली आहे. ही मोडतोड का ? आणि कोणी केली ?   हि मोडतोड करून काय साध्य केले ? याचे उत्तर अणुत्तरीत आहे . बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेऊन संबंधी तावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशानी केली आहे.

No comments:

Post a Comment