दुचाकी मालकांनो सावधान...! किटवाड येथे स्प्लेंडर गाडी चोरीचा प्रयत्न - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2024

दुचाकी मालकांनो सावधान...! किटवाड येथे स्प्लेंडर गाडी चोरीचा प्रयत्न



कुदनूर : सी एल वृत्तसेवा 
     चंदगड व कर्यात भागात घराच्या मागील बाजूस ठेवलेले चुलीवरील तांब्याचे हंडे, पितळेची भांडी चोरणारी टोळी कार्यरत झाली आहे. या तक्रारी सुरू असताना किटवाड येथे दुचाकी चोरीचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरला. बुधवार दि. १८/०९/२०२४ रोजी रात्री पाटील गल्ली, किटवाड ता चंदगड येथे घरासमोर लावलेल्या नवीन स्प्लेंडर गाडी चोरीचा प्रयत्न फसला. स्प्लेंडर गाडीचे हँडल लॉक चोरांना हँडल तोडता आले नाही.
     भरमा मारूती हेब्बाळकर हे रोजच्याप्रमाणे कामावरून येऊन घरासमोर त्यांनी गाडी लावली होती. त्या रात्री जेवण  झाल्यानंतर रात्री बारापर्यंत त्यांचे घरी काम असल्यामुळे ते जागरण करत होते. तेव्हा पर्यंत चोरांची कोणती हालचाल दिसून आली नाही.
सकाळ होताच ते आपल्या कामात व्यस्त होते जेव्हा ते कामाला जायला निघालेत तेव्हा पाहता तर जागची गाडी जाग्यावर नव्हती. नवीन स्पलेंडर गाडीचे नटबोल्ट खोलून काही पार्ट चोरट्यांनी चोरले हे त्यांच्या लक्षात आले. त्याने गावच्या ग्रुप वरती मीडियाच्या साह्याने ही बातमी पोहोचवली आणि चौकशी सुद्धा केली पण कोणतेही गोष्ट त्या रात्री कोणाच्या निदर्शनास आली नाही. 
    गावातील नागरिकांची सुरक्षितता आणि गावची सुद्धा यासाठी गावांमध्ये पंचायत मार्फत याविषयीची माहिती दवंडीद्वारे देण्यात आली. गावामध्ये कोणताही नवखा आज्ञात इसम संशयितरित्या आढळला तर त्वरित त्याची चौकशी करून त्यावर नजर ठेवावे अशा सूचना देण्यात आल्या.
    या कर्यात भागात सध्या वारंवार चोऱ्या होत्या दिसत आहेत पण या संदर्भात चोरांचा तपास लागत नाही. मागील काही महिन्यांमध्ये किटवाड गावातील दोन्ही डॅमच्या धरणावरील पाणीपंपाच्या वायर चोरीला गेल्या होत्या. या सर्व घटनांमुळे कर्यात भागातील नागरिकांना धोरण पासून सावधगिरी पळवण्याची गरज निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment