चंदगड : सी एल वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना जन आधार दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, निराधार व इतर संघटना चंदगड तालुका याच्या वतीने दि. 22/9/2024 रोजी आपल्या मागणी चे निवेदन पाठवले. त्याच निवेदनाची प्रत मे तहसीलदार चंदगड याना उदया देणार आहे. सर्व मागण्या पुढील प्रमाणे नंबर १) दिव्यांगाना मासिक ६००० पेन्शन मिळावी, २) पेन्शन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला खात्यात जमा व्हावी, ३) सर्व दिव्यांग विधवा परीतकत्या निराधार याना अंत्योदय रेशन कार्ड मिळावे, ४) या सर्वांना विना अट घरकुल योजना मिळावी, ५) दिव्यांगाच्या उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपये ची अट रद्द करून १ लाख करण्यात यावी, ६) तसेच विधवा, परित्यक्ता, निराधार याची उत्पन्न मर्यादा २१ हजार आहे ती रद्द करून ती ५० हजार रुपये करावी, ७) या सर्व घटकांना लाईट बिलामधे ५० टक्के सवलत मिळावी. सर्व योजनांचा लवकरात लवकर अंमल करून सर्व लाभार्थी ना प्राधान्य देण्यात यावे या मागणी चे निवेदन पाठवले आहे.
No comments:
Post a Comment