ठिय्या आंदोलनाबाबत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समजा विषयी विविध मागण्यासाठी बेमुदत उपोषण सुरु आहे. या उपोषनाला पाठिंबा देणेसाठी व शोधलेले कुणबी दाखले मराठा समाजाला वेळेत देण्यासाठी मा. जिल्हा अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक 26/09/2024 पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु होत आहे. याचे निवेदन आज मा. अप्पर जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले.
26 सप्टेंबर पासून समस्त मराठा आरक्षण समर्थक बांधवांनी भेट देऊन पाठबळ द्यावे असे आवाहन सकल मराठा कोल्हापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सहाव्यiदा अमरण उपोषण सुरु केले आहे. परवा त्यांची प्रकृती खूपच गंभीर झाली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र चिंतेत होता. अस्वस्थ महाराष्ट्रlने दि.23 सप्टेंबर रोजी बंदची हाक दिली होती. आज कोल्हापूर येथे या बंद बाबत चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली.
महाराष्ट्र सरकारने येत्या दोन दिवसात मागण्यiचा योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे. 23 तारखेचा बंद पुढे ढकलण्यात आला असून शासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे कृती न केल्यास बेमुदत महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
यावेळी अनेकांनी मते व्यक्त केली. त्यामध्ये प्रामुख्याने हणमत पाटील- हातकनंगले, डॉ राजीव चव्हाण भुदरगड, महिपती बाबर - शिरोळ, शहाजी देसाई- भुदरगड, संजय नाईक - राधानगरी, भगवान कोईगडे - करवीर, दिपक पाटील - शिरोळ, निलेश चव्हाण - कोल्हापूर शहर, संदीप यादव - पन्हाळा, सचिन हंचनाळे - कागल, दत्तात्रय दीक्षित- कोल्हापूर, दत्तात्रय मेठील - करवीर, दत्तात्रय जगदाळे - शिरोळ, बाळासाहेब भोगावे- शिरोळ, राजाराम देसाई - आजरा, सुधाकर देसाई - भुदरगड, रंजना पाटील - कोल्हापूर आदी सकल मराठा बांधवांनी मनोगते व्यक्त केली.
No comments:
Post a Comment