आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून सांबरे येथील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न निकाली, डिपी अन्यत्र हलविण्यासाठी प्रशासकीय कामाला मंजूरी - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2024

आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून सांबरे येथील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न निकाली, डिपी अन्यत्र हलविण्यासाठी प्रशासकीय कामाला मंजूरी

 

सांबरेसाठी डिपी स्थलांतराला मान्यता मिळवून दिल्याबददल आमदार राजेश पाटील व मधूकर नाईक यांचा सन्मान करताना सांबरे ग्रामस्थ

तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
   सांबरे (ता. गडहिंग्लज) येथील शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा प्रश्न आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून सोडविण्यात येथील शेतकऱ्यांना यश आले आहे.
येथील एल टी लाईन दरम्यान अनेक शेतकऱ्यांचे शेती पंपांचे जुने कनेक्शन आहे . सध्यस्थितीत एल टी लाईन अंतर जास्त आहे . या लाईन वरून येथील अनेक  शेतकऱ्याच्यां कूपनलिकाना विजपुरवठा घेण्यात आला आहे . पण बोअरना  पाणी मुबलक असूनही   वीज पुरवठा कमी  प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने शेती करणे अवघड जात होते.त्यामुळे एल टी  लाईन अंतर कमी करून यातील एक DTC शिफ्ट करून मिळण्यासंदर्भात येथील शेतकरी गेल्या दहा वर्षापासून विज वितरण कडे मागणी करत  होते . पण हा प्रश्न निकाली निघत नव्हता .
शेवटी या शेतक ऱ्यांनी हा प्रश्न आमदार राजेश पाटील यांना सोडविण्यासाठी विनंती केली.त्यानुसार संबधित विभागाकडे रीतसर अर्ज केला होता.आमदार राजेश पाटील यांनी सदर प्रश्नाबाबत महावितरण अधिकारी यांचेशी थेट चर्चा करून तात्काळ आपले शिफारस पत्र संबधित विभागाला देऊन संबधित कामाचा पाठपुरावा करत सदर डीपी अन्यत्र हलविण्याची प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली.
 त्यानुसार सरपंच ग्रामपंचायत सांबरे येथील रोहित्र स्थलांतर करणेकामी एकूण ३ लाख ४५ हजार रु.रक्कमेच्या कामाची प्रशासकीय मंजुरी नुकतीच मिळाली असून सदरील एल टी लाईन वरील शेतकऱ्यांचा शेतीसाठीचा विजेचा सुटणार आहे.त्यामुळे पुंडलिक कळवीकट्टेकर ,विनोद कळवीकट्टेकर ,विठोबा वाईंगडे,विलास अण्णा हिडदुगी,लक्ष्मण कोले,रामा सावंत,परशराम खोराटे,संजय पाटील,ईश्वर कोले,कलापा वाइंगडे आदी शेतकऱ्यांनी या मान्यतेनंतर आमदार राजेश पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शाल, श्रीफळ व गुच्छ देऊन सत्कार करून आभार व्यक्त केले. तसेच मधुकर नाईक यांचा देखील त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी सांबरे येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment