कोवाड येथे ताम्रगड प्रतिष्ठान च्या अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
विविध लोकाभिमुख उपक्रमांत अग्रेसर असलेल्या 'ताम्रगड प्रतिष्ठान चंदगड' मार्फत किणी कर्यात भागात सुरू होत असलेल्या 'रामू मास्तर अभ्यासिका' व 'डॉ डी व्ही तोगले सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र' चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील गरीब, होतकरू, अभ्यासू व प्रयत्नवादी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची कवाडं खुली करून कर्यात भागातू़न अनेक उच्चपदस्थ अधिकारी निर्माण करणारी केंद्र ठरतील. असा विश्वास राज्यकर सहआयुक्त विनोद देसाई मुंबई यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केला. ते कोवाड येथे नुकत्याच झालेल्या वरील अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन आर पाटील होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपसंगम कापड दुकान चे मालक दयानंद सलाम यांनी केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन श्रीमती मंगलाताई तोगले यांच्या हस्ते तर अभ्यासिकेचे उद्घाटन श्रीमती शांताबाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सुधीर नाकाडी (वित्त संचालक मंत्रालय मुंबई) यांनी तालुक्यात थोड्या उशीरा का होईना पण अत्यावश्यक असा उपक्रम सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. उद्घाटनयावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जॉर्ज क्रूझ यांनी विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधून मौलिक मार्गदर्शन केले. भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून देत आहोत त्याचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांनी आपले करीअर घडवावे असे अवाहन अध्यक्ष एन आर पाटील यांनी केले. यावेळी प्रा. सुखदेव शहापूरकर, ब्रह्मानंद पाटील, पी बी पाटील, हेमंत कोलेकर, अनिल कुराडे, अजित पाटील, व्ही एन देसाई, एम बी पाटील, गजानन नांदुडकर आदींसह परिसरातील विविध गावचे नागरिक, पालक, विद्यार्थी, ताम्रगड प्रतिष्ठानचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष बेळगावकर यांनी केले. नरेंद्र हिशेबकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment