पाटणे फाटा येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्या उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

21 September 2024

पाटणे फाटा येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्या उद्घाटन



कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

      पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे उद्या रविवार दिनांक २२ रोजी सायंकाळी ४ वाजता शिवसेनेच्या (शिंदे गट) जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. शिवसेना नेते व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते व जिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास तालुक्यातील शिवसेना, युवा सेना, वाहतूक सेना, महिला आघाडी, असंघटित कामगार सेना,व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिंदे गट शिवसेनेचे चंदगड तालुकाप्रमुख कल्लाप्पा निवगिरे, चंदगड विधानसभा सहसंपर्कप्रमुख डॉ. नामदेव निट्टूरकर, शिव उद्योग सेना चंदगड तालुकाप्रमुख सुशांत नौकुडकर आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment