कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
गणेशोत्सवानिमित्त आकर्षक श्री गणेश मूर्ती व डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक ९, १० व ११ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रोख रु ५ हजार, ३ हजार, २ हजार, १ हजार व सर्व विजेत्यांना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. तुळशीदास लक्ष्मण जोशी उर्फ तुलसी महाराज यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा फक्त कालकुंद्री गावासाठी मर्यादित आहे. घरगुती गणपती साठी खुली असलेल्या या स्पर्धेचे परीक्षण ९ ते ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. तर बक्षीस वितरण १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा केले आहे.
No comments:
Post a Comment