गवसे येथील पावणाई देवी सेवा संस्थेची ३६ वी वार्षिक सभा उत्साहात, संस्थेला ६,५३,४४० नफा - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2024

गवसे येथील पावणाई देवी सेवा संस्थेची ३६ वी वार्षिक सभा उत्साहात, संस्थेला ६,५३,४४० नफा

 

गवसे येथील पावणाई देवी सेवा संस्थेची ३६ वी  वार्षिक सभा उत्साहात, संस्थेला ६,५३,४४० नफा

चंदगड / प्रतिनिधी

            गवसे (ता. चंदगड) येथील श्री पावणाई देवी वि.का.स. (विकास) सेवा संस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण संस्थेच्या सभागृहात उपाध्यक्ष विजय कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पुजन अल्लीसाब सय्यद व सरपंच सौ. पुनम नाईक यांचे हस्ते करण्यात आले. प्रास्तविक व स्वागत संस्थेचे संचालक आप्पाजी मष्णू पाटील यांनी केले. 

      संस्थेची नोटीस व अहवाल वाचन संस्थेचे सचिव किशोर देसाई यांनी केले. नफा निश्चित करणेपुर्वी सभासद ठेवीवर ८% प्रमाणे रुपये ३,११,१८२/- इतकी तरतुद केली आहे. संस्थेला निव्वळ नफा रु. ६,५३,४४०.२२इतका झाला आहे. सभासदांना ९% लाभांश देणार असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष विजय कांबळे यांनी जाहीर केले. संस्थेला ऑडीट वर्ग "अ" मिळाला आहे. यावेळी झालेल्या चर्चेत आप्पाजी पाटील, विठोबा नेवगे, अविष्कार नाईक, नारायण गुरव, आप्पाजी कांबळे, नामदेव इलगे, हणमंत इलगे, श्रीपती गावडे, इरशाद मुल्ला, आदी सभासदांनी सहभाग घेतला. सभासदांच्या प्रश्नांना उपाध्यक्ष श्री. कांबळे यांनी उत्तरे दिली.यावेळी सभेला संचालक  हणमंत गुरव, अर्जुन देवळी, रामचंद्र नांदवडेकर, बाळू पाटील, केशव इलगे, सलीम फकीर, सखाराम कांबळे, संचालिका श्रीमती मंगल नेवगे, उपसरपंच इरफान सय्यद यांच्यासह सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे ज्येष्ठ संचालक आप्पाजी पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment