सांगाती पतसंस्था सभासदाना १५ टक्के लाभांश वाटणार, ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2024

सांगाती पतसंस्था सभासदाना १५ टक्के लाभांश वाटणार, ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा

 


चंदगड / प्रतिनिधी 

        शिनोळी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहत येथील सांगाती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची ३० वी  वार्षिक सर्वसाधारण सभा काल  संस्थेचे चेअरमन श्री. नितीन नारायण पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली संप्पन्न झाली.प्रारंभी संस्थेचे दिवंगत सभासद, हितचिंतक, वीर जवान यांना  सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

     उपस्थित सभासदांचे स्वागत संस्थेचे चेअरमन नितीन नारायण पाटील यांनी करून आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या वाटचाली विषयी माहिती देवून संस्था कामकाजात मोलाचे सहकार्य लाभलेल्या  सर्वांचे आभार मानून संस्थेला रु.६४ लाख ०३ हजार ३६१ रुपयांचा निव्वळ  नफा झाल्याचे सांगीतले. दि. ३१.३.२०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील संस्थेच्या कामकाजाचा अहवाल व आर्थिक पत्रकांचे वाचऩ संस्थेचे सचिव    गावडू नारायण पाटील यांनी केले.

        संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रा. बाबुराव नेसरकर यांनी अहवाल सालात संस्थेला ६४,०३,३६१,३३  रुपये नफ्याची विभागणी सभेसमोर मांडून १५% प्रमाणे लाभांश जाहिर केला. तसेच कर्जदाराचा  नैसर्गिक मृत्यू झाल्यास चा लाखा पर्यंतचे  कर्ज माफ योजनेची  सुरवात करण्याबाबतचा विषय मांडून  सदर योजनेविषयी नियम व अटी सभेसमोर सादर केल्या. यावेळी सर्व सभासदांनी सदर योजना चालु करणेबाबत सर्वानुमते मंजूरी दिली.

     प्रश्नोत्तराच्या वेळी अनेक सभासदांनी  विविध विषयावर प्रश्न विचारुन संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली . रचनात्मक दृष्टीकोनातुन विविध विषयावर चर्चा  झाल्यानंतर सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. आभार चंदगड शाखा चेअरमन प्रा. एच. के. गावडे  यांनी मानले.

      यावेळी संस्थेचे संचालक सतीश सावंत, मोनाप्पा पाटील,  दयानंद लांडे, अनंत सदावर, शरद पाटील, मारुती भोगण,  हणमंत गाडीवड्डर, दशरथ कांबळे, सौ. राजश्री पाटील, अस्मिता करटे , संस्थेचे माजी चेअरमन हिरामणी कृष्णा तुपारे तसेच सभासद नारायण राणबा पाटील, एम.एन.पाटील, एम.जे.पाटील, डॉ.मधुकर जाधव,अनंत नेसरकर  नारायण कोकितकर, कृष्णा पाटील, तानाजी खांडेकर, प्रा. रमेश भोसले , अमृत कदम, नामदेव राघोजी,  यासह सभासद, सेवकवर्ग उपस्थित होते.  

No comments:

Post a Comment