चंदगड / प्रतिनिधी
बेदरकार पणे दुचाकी चालवून अपघात करणाऱ्या तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील जोतिबा गणपती अडकूरकर याला चंदगड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश व्ही. एस. आग्रवाल यानी १५ दिवसाची शिक्षा व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
बेळगाव-वेंगुर्ला राज्य मार्गावर १० जून २०१७ रोजी सकाळी ९ वाजता मजरे कारवे ता.चंदगड गावानजीक दुचाकी गाडीचा अपघात होऊन या अपघातात कालू दुवाजी पाटील हे इसम मयत झाले होते.या बाबत चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.अपघातास कारणीभूत असलेल्या जोतिबा अडकुरकर याच्यावर चंदगड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.चंदगड चे प्रथमवर्ग न्यायाधीश व्हि एस अग्रवाल यांच्यासमोर सदर प्रकरणाची सुनावणी झाली.सरकारी वकील श्रीमती संगीता पाटील यांनी मांडलेलेला युक्तिवाद आणि तपास अधिकारी यांनी दिलेली साक्ष ग्राह्य मानून जोतीबा अडकुरकर यास शिक्षा व दंड ठोठावण्यात आला आहे.याकामी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शहनाज कनवाडे,प्रविण घोडेकर (स्टेनोग्राफर)उमेश राणे (वरिष्ठ लिपिक)बळीराम वाडकर यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment