स्त्रीचा मान सन्मान करा - नायब तहसीलदार कामत, हलकर्णी महाविद्यालयात 'महिला अत्याचार प्रतिबंधात्मक जनजागृती' कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2024

स्त्रीचा मान सन्मान करा - नायब तहसीलदार कामत, हलकर्णी महाविद्यालयात 'महिला अत्याचार प्रतिबंधात्मक जनजागृती' कार्यक्रम संपन्न

 

हलकर्णी (ता. चंदगड) येथील महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना नायब तहसिलदार हेमंत कामत, शेजारी पो. नि. विश्वास पाटील व प्राध्यापक. 

चंदगड / प्रतिनिधी

        'मोबाईलच्या अतिवापरामुळे माणसांची संवेदनशीलता नष्ट होत चाललेली आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीत सुसंवाद व संस्कारक्षम वातावरण होते. आजकाल त्याची कमतरता असून शिक्षक ,पालक यांच्याकडून मार्गदर्शनाचा लाभ घेऊन विद्यार्थिनींनी सक्षम बनावे.' असे प्रतिपादन चंदगडचे नायब तहसीलदार हेमंत कामत यांनी केले ते हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात चंदगड तहसील, चंदगड पोलीस ठाणे यांच्यामार्फत महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार समिती व सखी सावित्री मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'महिला अत्याचार प्रतिबंधक जनजागृती' कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते. 

      याप्रसंगी व्यासपीठावर चंदगड पोलीस निरीक्षक विश्वास पाटील , उपनिरीक्षक शितल धविले, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, नॅक समन्वयक डॉ. राजेश घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे स्वागत प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी केले. प्रास्ताविक ग्रंथपाल व्ही. जी. केळकर यांनी केले. प्रारंभी ऐश्वर्या पाटील, वैष्णवी शिंदे, प्रतीक्षा कांबळे, संचिता मोरे यांनी समाजातील महिला अत्याचाराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. 

     पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आपल्या मनोगत म्हणाले, 'मुलींनी स्वतःला असुरक्षित समजू नये. महिलाविषयीचे सर्व कायदे आज बदलले असून महिला सुरक्षिततेची कायदेशीर पावले उचलली जात असून अपेक्षित बदल लवकरच दिसून येईल'. यावेळी प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जे. जे. व्हटकर यांनी केले तर आभार प्रा. जे. एम. उत्तुरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment