चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनची बैठक तांबुळवाडी (ता. चंदगड) येथे नुकतीच संपन्न झाली. बैठकीमध्ये चंदगड तालुक्याच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष- जॉनी फर्नांडिस, सचिव- आनंद पाटील, खजिनदार- वैजनाथ कांबळे, उपाध्यक्ष- दिपक पवार व सदस्यांची निवड करण्यात आली. राज्य संघटक विजय राजिगरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना १० हजार दिवाळी बोनस, शिष्यवृत्तीचे स्लॉट त्वरित ओपन करावे, घरकुल साठी तीन वर्षांपूर्वीची नोंदणी अट शिथील करावी, ६० वर्षांवरील नोंदणीकृत कामगारांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन चालू करावी, हक्काची मेडिकल योजना चालू करावी आदी मागण्यांसाठी भविष्यात संघर्ष करुन लाभ मिळवावे लागतील त्यासाठी सर्वांनी तयार राहावे लागेल. यावर बैठकीत चर्चा झाली.
यावेळी तालुका सदस्य अनिल गावडे, भावकु जाधव, सोमनाथ मंडलिक, मनोहर गावडे, शाहू भोसले, सागर चिखलकर, मारियन फर्नांडिस, परशराम नागरदळेकर, संजय कांबळे, कृष्णात नाईक, पुनम गोरल, रेखा तरवाळ, माधुरी पाटील, पुष्पा नाईक, अश्विनी कांबळे, रोहिणी पाटील, कार्यालय सदस्य रेश्मा दळवी, दिपाली शिरगावकर, सविता बुरुड, सागर कांबळे आदी सभासद उपस्थित होते.
No comments:
Post a Comment