चंदगड / प्रतिनिधी
राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेने गेल्या चार वर्षात उल्लेखनीय व उत्तुंग कार्य केल्यामुळे एशियन बुक पब्लिकेशन व समृद्धी प्रकाशन तसेच राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण बहुउद्देशीय सामाजिक संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग साधना सामाजिक संमेलनामध्ये, सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर कुलकर्णी व माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते सन २०२४ चा "महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार " देऊन गौरवण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर व मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा संघटना व समाजातील उपेक्षित व वंचित घटकासाठी अविरतपणे कार्य करीत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना सन १९७९ पासून "गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार" देऊन सन्मानित केले जाते. अशा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील प्रमुख गुणवंत कामगारांनी एकत्र येऊन "राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र राज्य" या सेवाभावी संस्थेची शासनाकडे नोंदणी केलेली आहे. सदर असोसिएशनच्या राज्यभरातील वैशिष्ठ्यपूर्ण तसेच कार्याद्वारे संस्थेने उंच भरारी मारल्यामुळे संस्थेला पहिलाच मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
No comments:
Post a Comment