कुदनूर : सी एल वृत्तसेवा
काही महिन्यांपूर्वी कुदनूर येथील संतोष मुतकेकर यांचा शेतात काम करताना ट्रॅक्टरच्या रोटर मध्ये सापडून अपघातात पाय निकामी झाला होता. अनिरुद्ध रेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रूग्णांच्या आनंद मेळाव्यात वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांंची भेट झाली. त्यावेळी संतोष यांना जयपूरी पाय उपलब्ध करून देण्याचे ठरले होते. त्यानुसार शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर यांनी कृत्रिम जयपूरी पाय उपलब्ध करून दिला. मुतकेकर यांच्या कुदनूर गावी हा कृत्रिम पाय सुपुर्द करण्यात आला. याकामी डॉ संदेश जाधव यांनी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व राम राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अवयव प्रदान प्रसंगी सरपंच संगिता सुरेश घाटगे, शिंदे गट शिवसेनेचे चंदगड विधानसभा प्रमुख बाळासाहेब नावलगी, संपर्कप्रमुख डॉ श्री नामदेव निट्टूरकर, शिव उद्योग सेनेचे तालुकाप्रमुख सुशांत नौकुडकर, बापुसो घवाळे, कुदनूर येथील बी जी जाधव, हणमंत मोहनगेकर, भिमराव बामणे, प्रकाश केसरकर, चंद्रकांत कांबळे, शिवाजी ओऊळकर, जोतिबा गुंडकल, अर्जुन हेब्बाळकर , सतिश निर्मळकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment