किणी गणेशोत्सव मंडळ मार्फत ९ ते १३ रोजी भाषण, रेकॉर्ड डान्स व सामान्य ज्ञान स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2024

किणी गणेशोत्सव मंडळ मार्फत ९ ते १३ रोजी भाषण, रेकॉर्ड डान्स व सामान्य ज्ञान स्पर्धा

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
   किणी (ता. चंदगड) येथील जय कलमेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मार्फत गणपती उत्सव काळात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा चंदगड, आजरा, गडहिंग्लज व बेळगाव तालुक्यातील स्पर्धकांसाठी खुल्या असून लहान गटातील सामान्य ज्ञान स्पर्धा चंदगड तालुकास्तरीय आहे.
  स्पर्धा वेळापत्रक व बक्षिसे पुढील प्रमाणे- सोमवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता भाषण स्पर्धा  (इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी) विषय- बाई पण भारी देवा, सरकारी मदत योजना गरज की बाजार, बदलते राजकारण आणि लोकशाही, छत्रपती शिवाजी महाराज, धडपडणारी आजची तरुणाई  वेळ ७ मिनिटे, बक्षिसे रोख रु. २५००, २०००, १५००, १०००, ७५१. मंगळवार दि १० रोजी रात्री ८ वाजता खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा बक्षिसे रोख रु ५०००, ४०००, ३०००,  २०००, १५००, १०००. शुक्रवार दि १३ रोजी सकाळी ११ वाजता सामान्य ज्ञान स्पर्धा इयत्ता ६ ते ८, बक्षिसे रुपये २०००, १५००, १०००, ७५१, ५००, ३५१. तालुका स्तरीय इयत्ता ३ ते ५ साठी बक्षिसे रु १०००, ७५१, ६००, ५००, ३५१, २५१, १५१, १०१ याशिवाय सर्व बक्षीस विजेत्यांना पाच चमकते तारे यांच्याकडून चषक देण्यात येणार आहे स्पर्धेत स्पर्धक आणि अधिक माहितीसाठी ९४२०४५९३६९, ८३७८८१९९५०, ९४०३२३२२७९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment