चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील भंडारी समाजाच्या समाजसेवी संस्थेस मान्यता - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2024

चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील भंडारी समाजाच्या समाजसेवी संस्थेस मान्यता

 

कोल्हापूर येथे समाजसेवी संस्थेचे मान्यता पत्र स्वीकारताना भंडारी समाजाचे कार्यकर्ते

चंदगड : सी एल वृत्तसेवा

       चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यात वास्तव्य करणाऱ्या भंडारी समाज बांधवांनी समाजाच्या वतीने स्थापन केलेल्या सेवाभावी संस्थेस मान्यता देण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यास अनुसरून शासनाकडून या सेवाभावी संस्थेस मान्यता मिळाली आहे.

   या संस्थेच्या वतीने चंदगड, आजरा, गडहिंग्लज उपविभागात राहणाऱ्या भंडारी समाज बांधवांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम व योजना अधिकृतपणे राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समाजाचा आर्थिक स्तर उंचावणे, सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न करणे, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण व व्यवसायात सहकार्य करणे, सर्वधर्मसमभाव रुजवण्यासाठी उपक्रम राबवणे आदी कार्यक्रम संस्था राबवू शकते. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र नुकतेच शासनाकडून समाजाच्या कार्यकर्त्यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबू रा हळदणकर, कोशाध्यक्ष बाबुराव बा. हळदणकर, उपाध्यक्ष पांडुरंग पाटकर, सेक्रेटरी मोहन नाईक, सदस्य- सतीश पेडणेकर, अनिल मातवंडकर, परशराम सातार्डेकर, संदीप नाईक, उत्तम नाईक, विष्णू ओऊळकर, चंद्रकांत पाटकर, रमेश पेडणेकर, बाळासाहेब हळदणकर, मोहन पेडणेकर, सुरेश हळदणकर, सुरेश डोणकर, सुनील डोणकर, बंडू बांदेकर आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment