चंदगड / प्रतिनिधी
शिनोळी खुर्द ते देवरवाडी जाणारा रोडवर शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथे कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने जुगार अड्ड्यावर छापा टाकून 58 जनांच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये १ लाख २० हजार वीस रुपयाची रोख रक्कम, साडेपाच लाखांचे 55 हँडसेट व जुगाराचे साहित्य यासह 8 हजारांची नोटा मोजण्याची मशीन असा एसूण ६ लाख ७८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक घोरपडे यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे.
शुक्रवारी सायंकाळी सात वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने हा छापा टाकण्यात आला. यामुळे अवैध व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. यामध्ये चंदगड तालुक्यातील व्यक्तीसह बेळगाव जिल्ह्यातील व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे चेतन मसुटगे (सहाय्यक पोलीस निरीक्षक), दिपक निवृत्ती घोरपडे (पो.हे.कॉ.), रामचंद्र शामराव कोळी (पोहेकॉ), सागर जगन्नाथ चौगले (पोहेकॉ), सतिश कृष्णात जंगम (पोहेकॉ), वसंत शामराव पिंगळे (पोहेकॉ), महेश बाळासो आंबी (पोहेकॉ), समीर संभाजी कांबळे (पोहेकॉ), राजू ललिता कांबळे (पोकॉ), यशवंत विठ्ठल कुंभार (चालक पोहेकॉ) यांच्या पथकाने हि कारवाई केली.
No comments:
Post a Comment