मेळाव्यात बोलताना शिवाजीराव पाटील, व्यासपीठावर उपस्थित पदाधिकारी.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड मतदारसंघाच्या हितासाठी दिवस रात्र काम करतो आहे. युवक हा देशाचा आधारस्तंभ आहे. त्याला केंद्रस्थानी ठेवून मतदारसंघाचा सर्वागीण विकास करायचा आहे. हा युवक माझी उर्जा आणि या युवकांच्या उज्वल भविष्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे मत शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले. इनाम सावर्डे (ता. चंदगड) येथे आयोजित आयडियाज फॉर विकशीत महाराष्ट्र युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
![]() |
समोर उपस्थित जनसमुदाय. |
यावेळी भाजपा युवा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे म्हणाले,``विकसित महाराष्ट्रासाठी युवकांकडून संकल्पना घेण्यात आल्या. त्यांचा भाजप जाहीरना नाम्यात समावेश केला जाणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.
याप्रसंगी अनुपजी मोरे (प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र), सुदर्शन पाटसकर (प्रदेश सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा), हरमित सिंघ (भाजपा यूवा मोर्चा राष्ट्रीय सोशल मीडिया प्रमुख), तेजस्विनी कदम ( भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव), विजयेंद्र माने, प्रवीण फोंडे, गणेश साखरे, प्रिया पवार, ऋषिकेश कुट्रे (भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष चंदगड), विष्णू गावडे (संयोजक भाजपा युवा मोर्चा चंदगड विधानसभा), सिद्धेश कोरगावकर (भाजपा युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख), अश्विनीकुमार पाटील, सुधाकर पाटील, अशोक शिवणगेकर, एल. टी. नवलाज (युवा मोर्चा गडहिंग्लज), संग्राम पाटील (युवा मोर्चा आजरा) यांच्यासह एल. टी. नवलाज, तालुका अध्यक्ष ऋषिकेश कुट्रे, सुधाकर पाटील, कबड्डीपटू सिद्धार्थ देसाई, नामदेव कांबळे, अनिल शिवनगेकर यांच्यासह महिला भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुत्रसंचालन सह्याद्री देसाई यांनी केले. आभार विष्णू गावडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment