हलकर्णी येथे जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा, तिघे पळाले - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2024

हलकर्णी येथे जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा, तिघे पळाले

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

     चंदगड पोलिसांनी हलकर्णी (ता. चंदगड) येथे पैसे लावून तीन पाणी जुगार खेळणाऱ्या आठ  जणांविरुद्ध पुन्हा दाखल केला. यातील तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. ही घटना दि. २५/१०/२०२४ रोजी रात्री नऊ वाजता चे सुमारास घडली.

   याबाबत चंदगड पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, वरील वेळी यातील आरोपी दत्तू रामू नाईक (वरगाव), ज्ञानेश्वर भागाणा तुर्केवाडकर (रामपूर), संतोष रामू शिरोडकर (हलकर्णी), शंकर आप्पाजी नाईक (सोनारवाडी), धाकलू तुकाराम नाईक (हलकर्णी) या तीन पाणी जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. तर जागा मालक युवराज नाईक ( कुलकर्णी) व जुगार खेळताना पाहत उभे असलेले दोन इसम असे तिघे पळून गेले. वरील आरोपींकडून पोलिसांनी रोख रुपये १६२३०/-, अंथरलेली चटई व पत्त्याची पाने असा १६ हजार ३३० तीस रुपयांचा मुद्देमाल केला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक अरुण डोंबे यांनी दिली आहे. आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा नोंद केला असून पुढील  तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ पाटील करत आहेत.

No comments:

Post a Comment