कुदनुर / सी. एल. वृत्तसेवा
शाळा परिसरात मद्यपान, धुम्रपान, गुटखा खाणाऱ्यास ५ हजार रु दंड, पकडून देणाऱ्यास १ हजार बक्षीस देण्याचा ठराव निट्टूर (ता. चंदगड ) ग्रामपंचायतने केला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. शालेय विद्यार्थ्यावर परिणाम होऊ नये या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या काही कॉलेज वयीन तरुण व्यसनाधिन होत असल्याचे चित्र सगळीकडे दिसते. त्यांना त्यापासून परावृत्त करून ध्येयाकडे वाटचालीस प्रवृत्त करावे. यासाठी शाळा परिसरात मद्यपान, धुम्रपान, गुटखा खाणाऱ्यास ५ हजार रु दंड, पकडून देणाऱ्यास १ हजार बक्षीस देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

याबाबतची सुचना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी ग्रामपंचायत कडे तक्रार केली होती. ग्राम सभेत सरपंचानी पालक म्हणून आपली जबबाबदारी पार पाडण्यात चुकत आहोत का? याचा विचार पालकांनी करूया. आपले मुलगा कुठे फिरतो? मित्र मंडळी कोण? किती वाजता घरी येतो? याचा विचार करावा असे सुचवले. यावेळी गावातील काही दुकानात सर्वात जास्त विक्री सिगारेट ची होत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी कर्यात भागात एका गांजा विक्री करणाऱ्याला अटक झाली होती. त्याला काही कॉलेज वयीन मुले बळी पडल्याचे समजते. त्यामुळे गावातील दुकानदारांनी सिगारेट, बिडी व गुटखा विक्री करण्यास बंदी करावी. १ नोव्हेंबर असा प्रकार आढळून आल्यास ग्रामपंचायत मार्फत पोलीस स्टेशन ला कळविण्यात येईल. असा ठराव करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment