के.पी. पाटील यांच्या हाती मशाल, राधानगरीतून उमेदवारीने नव्या राजकीय उलथापालथी - चंदगड लाईव्ह न्युज

24 October 2024

के.पी. पाटील यांच्या हाती मशाल, राधानगरीतून उमेदवारीने नव्या राजकीय उलथापालथी



आजरा : सी एल वृत्तसेवा प्रतिनिधी
    राधानगरी - आजरा - भुदरगड विधानसभा मतदारसंघाच माजी आमदार के.पी. पाटील यांनी बुधवारी शिवसेना ठाकरे गटाची मशाल हाती घेतली. त्यांनी मुंबईत मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून त्यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. राष्ट्रवादी शरद पवार गटातून शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. त्यानंतर आजरा राधानगरी - भुदरगड मधून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार के.पी. पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे.
  यावेळी पाटील गटाचे कार्यकर्ते व आजरा शिवसेना ठाकरे गटाचे संभाजी पाटील व त्यांचे कार्यकर्ते मुंबईत मातोश्री वर उपस्थित होते. यामुळे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment