महागाव / सी. एल. वृतसेवा
फार्म. डी. (डॉक्टर ऑफ फार्मसी) हा अभ्यासक्रम क्लिनिकल फार्मसी आणि थेट रुग्ण सेवेवर लक्ष केंद्रित करतो. ज्यामध्ये बी. फार्म. आणि एम. फार्म. अभ्यासक्रमामध्ये नसलेले वास्तविक जगातील वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव देणारी हॉस्पिटल इंटर्नीशेप समाविष्ट आहे. फार्म.डी. (डॉक्टर ऑफ फार्मसी) ह्या अभ्यासक्रमाची रचना विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्ण आणि डॉक्टरांशी जवळून काम करण्याकरिता तयार करण्यात आली आहे. यामध्ये औषधोपचार व्यवस्थापन, फार्माकोव्हिजिलन्स आणि आरोग्यसेवा यावर लक्ष केंद्रित केले जाते, जे अधिक रुग्ण-केंद्रित भूमिकांशी सुसंगत आहे. तसेच, फार्म. डी. (डॉक्टर ऑफ फार्मसी) नंतर क्लिनिकल फार्मासिस्ट, हॉस्पिटल/कम्युनिटी फार्मासिस्ट, फार्माकोव्हिजिलन्स आणि ड्रग सेफ्टी रेगुलेटरी अफेअर्स स्पेसिऍलिस्ट, रिसर्च साइंटिस्ट, क्लिनिकल रिसर्च असोसिएट, मेडिकल रायटर, कॉलीटी कंट्रोल व कॉलिटी अशुरन्स इत्यादी क्षेत्रामध्ये देशात व विदेशात भरपूर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. फार्म.डी. पदवीधर आपल्या नावासमोर डॉक्टर असे शीर्षक लावू शकतात.
फार्म. डी. (Pharm-D) अभ्यासक्रम प्रवेश पात्रता
1. फार्म. डी. प्रवेशासाठी उमेदवार हा 12 वी विज्ञान (Science) शाखेतून उत्तीर्ण असावा व त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिकस अथवा बायोलॉजि हे विषय असणे अनिवार्य आहे.
2. तसेच, उमेदवाराने MHT-CET किंवा NEET प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे.
3. डी. फार्मसी उत्तीर्ण उमेदवार सुद्धा फार्म. डी. प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेऊ शकतात. 4. बी. फार्मसीसाठी अर्ज केलेले सर्व विद्यार्थी फार्म. डी. साठी पात्र राहतील.
सदर कोर्सला प्रवेश घेण्यासाठी सोमवार 28 ऑक्टोबर 2024 पूर्वी संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी येथे संपर्क करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सार पटेल यांनी केले.
अधिक माहितीसाठी संपर्क.
9860002258, 9730083834,
70570 61653
No comments:
Post a Comment