कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता चंदगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या माणसाने बैलगाडी ओढण्याच्या शर्यतीला मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन विकास सेवा सोसायटी चेअरमन अशोक पाटील व चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
![]() |
माणसाने बैलगाडी ओढण्याच्या शर्यत उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर व कल्मेश्वर मंडळाचे कार्यकर्ते व स्पर्धक |
खुला व शालेय विद्यार्थी अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे खुला गट विजेते गोकुळ मारुती पाटील (प्रथम), अपूर्व विलास कोकितकर (द्वितीय), स्वराज्य प्रकाश पाटील (तृतीय), प्रथमेश दयानंद जोशी (चौथा), किरण विष्णू जोशी (पाचवा). शालेय विद्यार्थी गटातील विजेते अनुक्रमे विराज विलास पाटील (प्रथम), विनायक राजेंद्र पाटील (द्वितीय), ओमकार कल्लाप्पा बागीलगेकर (तृतीय), पृथ्वीराज दयानंद जोशी (चौथा), विघ्नेश रामचंद्र पाटील (पाचवा).
स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी अशोक पाटील, श्रीकांत वै पाटील, प्रताप पाटील, शिवाजी, नाईक, माजी सैनिक आनंद पाटील यांच्या सह मंडळाचे कार्यकर्ते गजानन मोरे, मोहन नाईक, पांडू गोंधळी, कल्लाप्पा नाईक रवळू बागीलगेकर, सुरेश निं. जाधव व सदस्य तसेच स्पर्धक व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment