चंदगड (प्रतिनिधी) :
विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रत्येकांचीच लगबग सुरु झाली आहे. चंदगड मतदारसंघातून दौलत - अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे हे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर रोजी) सकाळी ११ वाजता जोरदार शक्तीप्रदर्शन करून चंदगड येथील तहसिल कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या दिवशी कार्यकर्ते, शेतकरी, कामगार, वाहतूकदार व हितचिंतकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
विधासभेची रणधुमाळी खऱ्या अर्थाने मंगळवार (दि. २२ ऑक्टोबर ) पासून सुरु झाली आहे. तर मंगळवार (दि. २९ ऑक्टोबर) पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यात मानसिंग खोराटे यांनी सध्या चंदगड मतदारसंघात सुरुवातीपासूनच वेगवेगळे जनसंवाद मेळावे घेऊन तसेच गणपती उत्सवात तब्बल 170 पेक्षा जास्त गणेश मंडळांना भेट देऊन आणि आजतागायत जवळपास 160 पेक्षा जास्त गावांमध्ये जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावला असून त्यांनी मतदारसंघातील गावनगाव पिंजून काढले आहे. त्यांचा वाढता पाठींबा पाहता अर्ज भरतांना मोठे शक्ती प्रदर्शन करतील अशी चिन्ह आहेत.
खोराटे यांनी चंदगड मतदारसंघाच्या सर्वांगिन शाश्वत विकासाचे धोरण घेवून प्रचार सुरू केला आहे. चंदगडचा बंद पडलेला दौलत कारखाना पुन्हा सुरु करण्याचं धाडस त्यांनी दाखवले आहे. गेल्या पाच वर्षात तो सुरळीत चालवून टॉप पाच कारखान्यामध्ये कारखाना पोहचवल्याने त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांनीही याच मुद्द्यावर चंदगड मतदारसंघातील चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह संपूर्ण मतदारसंघाचा विकासाचे व्हिजन घेवून निवडणूकीला सामोरे जात आहेत.
तरी सोमवारी (दि २८ ऑक्टोबर रोजी) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी दौलत कारखाना स्थळावरून रॅली काढत मोठे शक्त प्रदर्शनात चंदगड तहसिल कार्यालयात हा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment