चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड मतदार संघातून आज २२ ऑक्टोबर २०२४ रोजी पहिल्या दिवशी एकूण ४४ अर्जांची विक्री झाल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश चव्हाण यांनी दिली.
चंदगड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी झाली आहे. त्यामुळे अर्जांची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची शक्यता व्यक्त होत होती. आज पहिल्याच दिवशी महायुतीकडून आमदार राजेश पाटील, भाजप कडून शिवाजी पाटील तर महाविकास आघाडी कडून नंदाताई बाबुळकर, विनायक उर्फ अप्पी पाटील, गोपाळराव पाटील आदी इच्छुक १८ जणांनी ४४ अर्ज खरेदी केले. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे फक्षाकडूनही अनेकजण इच्छुक असले तरी असून त्यांनी अद्याप अर्ज घेतलेले नाहीत.
No comments:
Post a Comment