मुस्लिम समाजासाठी जो पक्ष विकास देईल त्यालाच मतदान....! प्रमुख मंडळीनी पत्रकार परिषदे मध्ये भूमिका मांडली... - चंदगड लाईव्ह न्युज

22 October 2024

मुस्लिम समाजासाठी जो पक्ष विकास देईल त्यालाच मतदान....! प्रमुख मंडळीनी पत्रकार परिषदे मध्ये भूमिका मांडली...

आजरा : सी. एल. वृत्तसेवा 

       आजरा शहरातील मुस्लिम समाजाचा केवळ मतदानासाठी उपयोग केला जातो. यापुढे जो पक्ष शाश्वत विकासाच्या योजना आमच्या समाजाला देईल त्यालाच आमचा समाज निवडणूकीत मतदान करेल अशी स्पष्ट भूमिका मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळीनी पत्रकार परिषदेत मांडली.

      आजरा शहरामध्ये मुस्लीम समाज हा मोठा आहे. प्रत्येक निवडणूकीत मतदानासाठी फक्त वोट -बँक म्हणून वापर राजकीय मंडळी करत असतात त्यामुळे विकास, शासकीय समाजाच्या हिताच्या योजना राबविल्या जात नाहीत. आज पर्यत योजनांचे कोणतेही फायदे व विकास निधी आम्हा मुस्लिम समाजाला दिलेला नाही.अशी खंत व्यक्त केली. आमदार - खासदार हे कोणतेही न पटणारी कारणे दाखवून टाळाटाळ करत आहेत.

  आमच्या समाजाच्या शिक्षण संस्था, प्रत्येक गल्लीमध्ये मशिदी, मदरशे, दफनभूमी आहे. अशा ह्या समाजाच्या हिताच्या गोष्टीकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. मतदानासाठी प्रत्येकाचे उंबरटे झिजवतात पण विकास कामात मागे पडतात हेच आमचे दुर्दव्य शहरातील पाणी, रस्ते, गटारी याची सगळीकडे बोंबाबोंब त्यामुळे आमचा समाज हा आज जागरूक झाला असून.' यापुढे मुस्लिम समाजाला कोणत्याही राजकीय पक्षाने मतदानासाठी गृहीत धरु नये.'

     विधानसभा अथवा कोणतीही निवडणूक असुदे ' जो आम्हाला शाश्वत विकास देईल त्याच पक्षाला, लोक प्रतिनिधीला लोक मतदान करतील.' समाजाचा विविध योजनांचा।विकास मागणे हा आमचा मुलभूत हक्क आहे. असे पत्रकार परिषदेमध्ये आपले मत मांडले यावेळी आजरा साखर कारखाना संचालक श्री. रशिद पठाण, अँड. जावेद दिडबाग, रियाज तकिलदार, समीर चाँद, गौस तकिलदार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment