कुदनूर :सी एल वृत्तसेवा
१४ वर्षे वयोगट जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेतील ६०० मिटर धावणे मुले गटात राजगोळी खुर्द येथील संकेत दशरथ मोरे यांने प्रथम क्रमांक पटकावला. त्याची डेरवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच राजगोळी खुर्द, ता. चंदगड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय सांघिक व मैदानी स्पर्धेत त्याने हे यश प्राप्त केले.
संकेत हा राजगोळी खुर्द हायस्कूल राजगोळी खुर्द शाळेचा विद्यार्थी असून स्पर्धेच्या अन्य विभागातही शाळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यांना मुख्याध्यापक पी बी कवठेकर, क्रीडा शिक्षक आर जी इनामदार, बी बी पाटील, एम जे पाटील, के ए पाटील, जे व्ही बर्वे आदींचे मार्गदर्शन लाभले. संकेत मोरे याला डेरवण येथील स्पर्धेसाठी आदर्श शिक्षण समूहाचे पदाधिकारी व राजगोळी ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment