कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
वाचन प्रेरणा दिनानिमित्त कालकुंद्री, ता.चंदगड येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाला श्री कल्मेश्वर विकास सेवा संस्था व श्रीकृष्ण दूध संस्थेचे चेअरमन अशोक रामू पाटील यांनी ५०००रु.(पाच हजार रुपयांची) निवडक व दर्जेदार पुस्तके भेट दिली.
"पुस्तकांनीच माझ्या दोन मुलांना उच्च विद्याविभूषित केले, जगण्याची दिशा दिली या जाणिवेतून व कृतज्ञतेतून मी या गावातील वाचनालयाला पुस्तके भेट देताना अत्यानंद होत आहे." असे मनोगत अशोक पाटील यांनी व्यक्त केले.
स्वागत प्रा डॉ व्ही आर पाटील यांनी केले. अशोक पाटील यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य विलास शेटजी यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देऊन करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे सदस्य, वाचक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचनालयाचे अध्यक्ष के जे पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment