मांडेदुर्ग केंद्रांतर्गत मौजे कारवे शाळेत शिक्षण परिषद उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

19 October 2024

मांडेदुर्ग केंद्रांतर्गत मौजे कारवे शाळेत शिक्षण परिषद उत्साहात

मांडेदुर्ग केंद्रातील तिसऱ्या शिक्षण परिषदेचे द्वीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना मान्यवर व मार्गदर्शक शिक्षक.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
  मांडेदुर्ग, ता. चंदगड केंद्रांतर्गत तिसरी शिक्षण परिषद नुकतीच उत्साहात पार पडली. केंद्र मुख्याध्यापक एम डी नाईक यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उद्योगपती रतन टाटा व अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधना निमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल शासनाच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला.
   संतान लोबो यांनी प्रस्तावित केले. सविता कुंभार यांनी प्रार्थना गायिली. यावेळी आनंदा पाटील, बाबू पाटील, शिवाजी पाटील या शिक्षकांनी राष्ट्रीय संपादनूक चाचणी, वीर गाथा, विद्यांजली पोर्टल, संकलित मूल्यमापन चाचणी, विज्ञान प्रदर्शन, पोस्को कायदा याविषयांवर मार्गदर्शन केले. 
यावेळी कडलगे शाळेचे अध्यापक अनिल बागीलगेकर यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास पदवीधर सभेचे अध्यक्ष अशोक नौकुडकर, कास्ट्राईबचे राम कांबळे, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष राजेंद्र चाळूचे यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीमा नांदवडेकर, शिवाजी यळळूकर, सट्टूपा लोहार, नंदा चाळूचे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment