गडहिंग्लज : सी एल वृत्तसेवा
गडहिंग्लज येथील सुप्रसिद्ध कवी विलास माळी यांच्या 'झांझरझाप' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उद्या रविवार दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. डॉ. घाळी कॉलेज सांस्कृतिक सभागृह गडहिंग्लज येथे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉ. राजन गवस यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळ गडहिंग्लजचे संचालक ॲड विकासअण्णा पाटील हे आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक प्रवीण बांदेकर तसेच लेखक, संपादक, कवी व चित्रकार मंगेश नारायणराव काळे हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य पुरस्कार विजेते कवी व समीक्षक प्राचार्य गोविंद काजरेकर, कवी व समीक्षक प्राध्यापक एकनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी साहित्य क्षेत्रासह सर्वांनी उपस्थित रहावे; असे आवाहन निमंत्रक कॉपर कॉइन प्रकाशन गाजियाबाद (दिल्ली) व साहित्य रसिक मित्र मंडळ गडहिंग्लज यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment