तेऊरवाडीच्या निवेदिता गडकरीची राज्य गोळाफेक स्पर्धेसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

19 October 2024

तेऊरवाडीच्या निवेदिता गडकरीची राज्य गोळाफेक स्पर्धेसाठी निवड

तेऊरवाडी /सी एल वृत्तसेवा
  तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील कु निवेदिता भरमू गडकरी हिने डेरवण (जि. रत्नागिरी) येथे झालेल्या १९ वर्षा खालील विभागीय शासकीय गोळाफेक स्पर्धेमध्ये द्वितिय क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल प्राप्त केले. कु निवेदिताची पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या उज्वल यशाबद्दल निवेदिताचे  तेऊरवाडी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment