'अभिजात दर्जा'मुळे मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्ठीकोन बदलेल...! आजरा येथील मराठी भाषा गौरव कार्यक्रमात प्राचार्य डाॅ. दत्ता पाटील यांचे प्रतिपादन - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2024

'अभिजात दर्जा'मुळे मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्ठीकोन बदलेल...! आजरा येथील मराठी भाषा गौरव कार्यक्रमात प्राचार्य डाॅ. दत्ता पाटील यांचे प्रतिपादन

आजरा येथील मराठी भाषा गौरव कार्यक्रम प्रसंगीची क्षणचित्रे

आजरा : सी एल न्यूज / प्रतिनिधी

      मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषा दर्जामुळे मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. असे विचार घाळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दत्ता पाटील यांनी व्यक्त केले. ते आजरा येथील चैतन्य सृजन सेवा संस्था व शिक्षण तपस्वी डॉ. जे.पी. नाईक पतसंस्था यांच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मराठी भाषा गौरव समारंभ प्रसंगी बोलत होते. रवींद्र सावंत यांनी स्वागत केले. वि. वा. शिरवाडकरांच्या फोटो  व ग्रंथ साहित्याचे पूजन डॉ. शिवशंकर उपासे, सुभाष विभूते, सुरेश दास यांनी केले.

      यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांनी अभिजात भाषा कशी झाली त्याचे शिलेदार त्याचा उगम त्या चे पुरावे यांचे संपूर्ण विश्लेषण व इतिहास यांचा विस्तार करून दाखविला. ३ आक्टोबर हा मराठी अभिजात भाषा दिन, गौरव दिन साजरा करणे मागचा उद्देश, मराठी भाषेच्या समृद्ध आणि अद्वितीय साहित्यीक परंपरेला मान्यता देणे व त्याचे महत्व, त्याच प्रमाणे अभिजात भाषा म्हणजे काय? एखादया भाषेला दर्जा कसा मिळतो, आता पर्यत कोण कोणत्या भाषेला दर्जा मिळाला आहे; अभिजात भाषा म्हणजे प्राचीन, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता म्हणजे अभिजात भाषा होय, अशा सर्व पुराव्यामुळे अभिजात भाषा ही परीपूर्ण आहे हे पटवून दिले.

      यावेळी झालेल्या काव्यवाचन कार्यक्रमात डॉ. उपासे, दयानंद उपासे, अनुष्का गोवेकर, राजश्री गाडगीळ, क्षितीजा उपासे, उत्तम कोकितकर यांनी सहभाग घेतला. यावेळी केंद्रप्रमुख पदी पदोन्नती बद्दल सुनील सुतार यांचा, सुधीर चोडणकर यांची स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

       सुत्रसंचालन डॉ. मारुती डेळेकर यांनी केले.  बळवंत शिंत्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वीतेसाठी संतोष जाधव, संजय तेजम, प्रताप होलम, निकिता स्वामी, तुषार येरुडकर, सुभाष पाटील, उत्तम कुंभार तसेच विद्यावर्धिनी चे व्यवस्थापक विलास पोवार व विकास पाटील यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment