आजरा : सी एल वृत्तसेवा / तालुका प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील कोळिंद्रे हे जिल्हा परिषद मतदार संघात अशोक चराटी गटाने चंदगड विधानसभा उमेदवार शिवाजी पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे. अण्णाभाऊ सभागृहात कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना शिवाजी पाटील म्हणाले, ``मागील निवडणूकीत मी नवखा उमेदवार असल्यामुळे व काही चुकांमुळे मला पराभव पत्करावा लागला. 5 वर्षे मी या भागात जिवाचे रान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मी कोट्यावधींची रुपयांचा निधी वितरित केल्याने भाजपाने मला तिकिट दिले तर उत्तम अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे, असे सांगत राजेश पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडले. सोईनुसार अनेक पक्ष झाले फक्त आराम केला. कारखाना १० वर्षे बंद होता. त्यामध्ये प्रयत्न केले नाहीत? केवळ गटातटाचे राजकारण केले.
निवडून येण्याची खात्री देत पाटील म्हणाले, ``आजरा व चंदगडला पर्यटनासाठी भरपूर वाव आहे, त्यांचा विकास साधणार आहे. महिला व तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. यापुढे माझा शाश्वत विकास असेल.
अशोक चराटी यांनी `कोळिंद्रे जि. प. मतदार संघातील ३५ गावांमध्ये संपर्क असून आपणांस निवडून आणण्याचे नियोजन करू अशी ग्वाही शिवाजी पाटील यांना दिली. आजरा तालुक्यातील तीन आमदार हे आमच्या मताचे असणार. उत्तूर व आजरा या बाबत कोणाला पाठींबा द्यायचा याचा निर्णय ४ दिवसात घेणार आहे. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल असेही त्यांनी सांगीतले. या मेळाव्याला विलास नाईक, विजय पाटील, दशरथ अमृते, सुरेश डांग, सी. आर. देसाई, संभाजी सरदेसाई, निवृत्ती शेंडे यांच्यासह कोळींद्रे जि. प. मतदार संघातील कार्यकर्ते हजर होते.
No comments:
Post a Comment