![]() |
महाराष्ट्र शासन वनविभागाच्या वतीने श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुरणी बुझवडे येथे वन्य जीव सप्ताह साजरा करताना मान्यवर |
चंदगड /सी एल वृत्तसेवा
चंदगड तालूका पर्यावरणाने समृद्ध असलेला एकमेव तालूका आहे. या तालूक्यात प्रचंड प्रमाणात जैव विविधता दिसून येते . पण अलिकडच्या काळात मानवाकडून या जैवविविधतेवर हत्यार चालवून ती नष्ठ करण्याचा प्रयत्न केला जात आहे . पर्यावरणातील अन्न साखळी टिकली तरच मानव सुद्धा जीवंत राहू शकतो . हिच अन्न साखळी टिकवण्या साठी पर्यावरणातील वन्य जीवांचे व वनसंपदेचे रक्षण करा , असे विचार कानूर खुर्द चे वनपाल सी पा पावसकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वतीने दि १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वन्य जीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . याप्रसंगा श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुरणी -बुझवडे (ता चंदगड येथे आयोजित कार्यक्रमामध्ये वनपाल सी पी पावसकर बोलत . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस के हरेर होते .
चंदगडला पश्चिम घाटाचे वरदान मिळाले आहे . या परिसरात पशू -पक्षी अगदी वाघ्यापासून ते हत्तीपर्यंत प्राणी वावरत आहेत . या प्राण्यांचे तसेच वनांचे रक्षण करणे हिआपली जबाबदारी असल्याने वनपाल पावसकर यानी यावेळी बोलताना सांगितल . भोगोली चे वनरक्षक एस एस होगले बोलताना म्हणाले चंदगड व वन्य व प्राणी संपदेने परिपूर्ण सजलेला असून मानवी आरोग्य चांगले राहण्या साठी या वनसंपदेचे व वन्य प्राण्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे .
यावेळी पिळणीचे व नरक्षक व्ही डी राऊत , मुख्याध्यापक एस के हरेर यानी पर्यवरण रक्षणाबाबत मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना वृक्ष सांगोपन व संवर्धनाची शपथ दिली .
या कार्यक्रमाला कुरणी बुझवडेच्या वनरक्षिका सुरेखा चाळके , कानूरच्या वनरक्षिका रेणूका नाईक , वनसेवक बाळू पवार , शंकर सुखये , वाय बी पाटील , रवि गिलबिले वन्यजीव बचाव पथक व विद्यार्थी उपस्थित होते . उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक एस के हरेर यानी केले .
प्रास्ताविक व सूत्रसंचालन ए ए अंबी यानी केले तर आभार एस के पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment