चंदगड/प्रतिनिधी
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण २०२३ कार्यक्रमांतर्गत चंदगड तालुक्यातील क्षयमुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत हजगोळी व लकीकट्टे ही दोन गावे क्षयरोग मुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले. ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीची औचित्य साधून या दोन गावांचा तहसीलदार राजेश चव्हाण चंदगड यांच्या हस्ते महात्मा गांधींचा ब्रांझ पुतळा व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.तहसील कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.२०२५ सालापर्यंत संपूर्ण देश क्षयरोग मुक्त करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण क्षयरोग मुक्तीसाठी ग्रामपंचायतीने पुढे यावे व सहकार्य करावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाकरिता गटविकास अधिकारी बी.डी.भोगे याच्या प्रमूख उपस्थितीसह तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बी.डी.सोमजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव सोहळा पार पडला.यावेळी विस्तार अधिकारी,आरोग्य सहाय्यक रवी पाटील, सरपंच शितल पवार( हाजगोळी) तसेच सरपंच संजीवनी पाटील (लक्कीकट्टे) व ग्रामसेवक उपसरपंच सदस्य तसेच कर्मचारी , आशा, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक ,आरोग्य सहायिका, एसटीएस दीपक नाईक, एसटीएलएस रोहित पाटील तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment