कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
राजगोळी - चनेहट्टी (ता. चंदगड) येथील ओलम शुगर्स (हेमरस) साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपण सोहळा बुधवार (दि. ०९ ऑक्टोबर रोजी) सकाळी ८ वाजता कारखाना स्थळावर कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांच्याहस्ते सपत्नीक होणार असून मंगळवारी श्री सुदर्शन पूजा संपन्न होईल. तरी या सोहळ्याला सर्व ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूकदार, कामगार, अधिकारी तसेच हितचिंतकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment