चंदगड / प्रतिनिधी
राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र राज्य व जागृत नागरीक सेवा संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील सर्व घटकांच्या उन्नती व प्रगतीकरीता सातत्याने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना, राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांचे दि.१४ ऑक्टोंबर २०२४ रोजी शाहू स्मारक भवन, दसरा चौक कोल्हापूर येथे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार सतेज पाटील व राज्यातील तसेच जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी दिली. राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनंदा दीदींच्या समाजसेवेतील अतुलनीय कार्याबद्दल जाहीर नागरी सत्कार सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला - क्रिडा, आरोग्य, पत्रकारीता, उद्योग, कृषी, आरोग्य, शासकिय व निम शासकीय सेवेत वैशिष्ठयपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभावीवृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना समाज भूषण, समाज रत्न, कला रत्न, श्रम रत्न, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक / शिक्षिका, कामगार भूषण, आदर्श संस्था, सहकार भूषण, कला भूषण, उद्योग भूषण, कृषी रत्न, योग रत्न असे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून
राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये सखाराम जाधव (आदर्श संपादक), आप्पासाहेब भोसले (आदर्श संपादक), उत्तम जगताप (आदर्श पत्रकार), आनंतराव घोगरे पाटील (समाजभूषण), राहुल आसुर्लेकर (कामगार भूषण), अरविंद मानकर (समाजभूषण), प्रसन्न पारकर (कामगार भूषण), रघुनाथ मुधाळे (समाजभूषण), लक्ष्मण जाधव (कला भूषण), शाहीर संजय गुरव (कला रत्न), सर्जेराव तोडकर (कामगार भूषण), बाजीराव माळी (कामगार भूषण), अमृत देसाई (कामगार भूषण), आनंदा कराडे (समाजरत्न), बाजीराव माणगांवे (समाजरत्न), सुजाता भोसले (योगरत्न), रोहित चव्हाण (योगगुरू रत्न), विवेक सावंत (स्थापत्य रत्न), दिलीप मिसाळ (कामगार भूषण), मनोज अनंत पाटील (क्रिडा रत्न), संतोष राऊत (कामगार भूषण), राजेश वर्तक (समाजभूषण), शिवाजीराव येडवान ( कामगार भूषण), संपतराव इनामदार (आदर्श समाजसेवक), राजेश गाढवे (कामगार भूषण), विजय म्हात्रे (सहकार भूषण), सुधाकर माळी (कामगार भूषण), बापू वाघ (समाजभूषण), सुभाष पाटील (समाज भूषण), विजय तुकाराम रणखांब (समाजभूषण), शिवकुमार मठवाले (कामगार भूषण), राधिका काळे (आदर्श लघु उदयोजिका), सुभाष पाटील (कामगार भूषण), योगेश बर्वे (समाजभूषण), संपत तावरे (समाज रत्न), हर्षद राऊत (क्रीडा रत्न), रेवती प्रवीण पाटील (आदर्श शिक्षिका), काकासो परीट (कामगार भूषण) यांचा समावेश आहे.
तसेच राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारामध्ये. गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे .मुंबई (सहकार भूषण) काळूराम लांडगे (कामगार भूषण), संजीवकुमार चिकुर्डेकर (कामगार भूषण), सुभाष हांडे देशमुख (समाज भूषण), दिलीप साटम (कामगार भूषण), प्रा. डॉ. प्रभाकर पवार (समाज भूषण), गजानन पाटील (समाजभूषण), निलेश पाटील (समाजभूषण), रमेश नाईक (समाजभूषण), तानाजी तावडे (कामगार भूषण), सुवर्णा काळे (आदर्श समाजसेविका), श्रद्धा तेंडूलकर (आदर्श समाजसेविका), गोविंद पाचपोर (कामगार भूषण), प्रफुल्ल आवारे (कामगार भूषण), केरबा डावरे (कामगार भूषण), रमेश तिवारी (कामगार भूषण), संदिप पिसाळ (कामगार भूषण), डॉ. सुहास पाटील (आदर्श संस्था), निलेश पाटील (श्रम रत्न), चंद्रकांत मोरे (समाज रत्न), भरत सकपाळ (समाज भूषण), प्रमोद काळे (कामगार भूषण), धनंजय पाटील (क्रिडा रत्न), पंडीत तेलंग (कामगार भूषण), दत्तात्रय शिरोडकर (समाजभूषण), अविनाश दौंड (कामगार भूषण), उमेश किर्दत (कामगार भूषण), अशोकराव जाधव (सहकार रत्न), पोपटराव महादेव देसाई (समाज भूषण) यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment