जनार्दन गंगाराम देसाई बाबुराव गणपती जाधव
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
सह्याद्री मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बेळगाव या मल्टीस्टेट पतसंस्थेची सभा नुकतीच कोवाड, तालुका चंदगड येथे पार पडली. यावेळी संस्थेच्या कोवाड शाखाध्यक्षपदी जनार्दन गंगाराम देसाई (कागणी) तर उपाध्यक्षपदी बाबुराव गणपती जाधव (कुदनूर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक इंत्राज घाबरू मस्करेंज (कालकुंद्री) हे होते. स्वागत व प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक महेश विलास चव्हाण यांनी केले. यावेळी संचालक शिवाजी दत्तू आडाव, सर्व शाखा सल्लागार, संचालक, कर्मचारी उपस्थित होते. जेष्ठ सल्लागार मारुती वैजू पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment