मुद्रांक विक्रेता व दस्त लेखनिक संघटनेच्या चंदगड तालुकाध्यक्षपदी महादेव भोसले - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2024

मुद्रांक विक्रेता व दस्त लेखनिक संघटनेच्या चंदगड तालुकाध्यक्षपदी महादेव भोसले

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      महाराष्ट्र राज्य मुद्रांक विक्रेता व दस्त लेखनिक संघटनेच्या चंदगड तालुका शाखाध्यक्षपदी महादेव धोंडीबा भोसले तर उपाध्यक्षपदी राजाराम गुंडू मुदाळे यांची निवड करण्यात आली. हातकणंगले येथे नुकत्याच झालेल्या कोल्हापूर व सांगली जिल्हा संघटनांच्या संयुक्त बैठकीत ही निवड घोषित करण्यात आली. अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य अध्यक्ष शंकर भिसे होते.

    यावेळी आळते तालुका हातकणंगले येथील अनिल बनकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमास हातकणंगलेचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्याध्यक्ष शंकर भिसे यांनी मुद्रांक, बिगर लेआउट मंजुरी, खरेदी पत्र नोंदविण्यात येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यासमोर मांडून त्या सोडवण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या लढ्यात विविध संघटना व जनतेने आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

     महादेव भोसले व राजाराम मुधाळे यांच्या निवडीबद्दल त्यांचे चंदगड तालुक्यातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment