चंदगड / सी एल वृत्तसेवा
श्री भावेश्वरी पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन अशोक शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. गतवर्षीपेक्षा संस्थेला चालू आर्थिक वर्षात ठेवी व कर्ज वाटपात वाढ झाली असल्याचे संस्थेचे संस्थापक अशोक आगाशे यांनी सांगितले.
संस्थेत चालू आर्थिक वर्षात ठेवी ६ कोटी झाल्या कर्ज वाटप ४ कोटी ७५ हजार झाल्याचे नमूद केले अहवाल सालात संस्थेचा चालू आर्थिक वर्षात ७ लाख ७० हजार इतका नफा झाला असून संस्थेला चालू वर्षात *ऑडिट "अ"* वर्ग मिळाल्याचे सांगितले. पतसंस्था सहकार विभागाच्या सर्व नियमांचे पालन करून चालवण्यात येत आहे. संस्थेवर ठेवीदार व इतरांचा विश्वास संपादन तसेच हित जोपासते सभासदांना लाभांश १० टक्के जाहीर केला संस्थेचे मॅनेजर संजय आगाशे यांनी सविस्तर इतिवृत्ताचे वाचन करून सभेपुढील विषयाचे व अहवाल वाचन केले. संस्थेचे व्हा. चेअरमन नामदेव मोरे संचालक भीमान्ना मोरे, तुकाराम गुरव, गोविंद फाटक,गणपती गुरव,तुकाराम मोहिते,सागर मटकर,सरस्वती गणाचारी,लक्ष्मण केरकर,चंद्रकांत नाईक संस्थेचे सर्व कर्मचारी संजय आगाशे, विक्रम कोंडूसकर, शुभांगी देसाई,निवृत्ती गुरव,रमेश खोत,निवृत्ती गायकवाड उपस्थित होते तसेच उपस्थित सभासदांचे चेअरमन अशोक शिरोडकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment