तिलारी घाटातून बससेवा सुरळीत सुरु करण्याच्या मागणी रास्ता रोको करताना सामाजिक कार्यकर्ते
चंदगड / प्रतिनिधी
गोवा दोडामार्ग कोल्हापूर बेळगाव जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातून गेल्या चाळीस वर्षापासून सुरू असलेल्या बसेस सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी चूकीचा अहवाल सादर केला यामुळे गेल्या साडेतीन महिन्यापासून बसेस बंद आहेत. बस सेवा सुरू करावी यासाठी गेल्या सोमवारी उपोषण केले होते या नंतर सममिती नेमली त्यांनी पाहणी केली.या निर्णय घेतो असे सांगितले पण निर्णय झाला नाही. सोमवारी बसेस सुरू न केल्याने अखेर मंगळवारी दोडामार्ग चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते यांनी तिलारी नगर या ठिकाणी दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे शेकडो वाहने तसेच नागरीक अडकून पडले. चंदगड नायब तहसीलदार तसेच चंदगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रांताधिकारी तहसीलदार, बांधकाम विभाग, एस टी डेपो याचा अहवाल तयार आहे. दोन दिवसात यावर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन प्रांताधिकारी गडहिंग्लज एकनाथ काळबांडे यांनी दिले यामुळे रस्ता रोको आंदोलन दोन तासांनी मागे घेतले.
रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लागलेल्या रांगा. |
सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांनी सदर घाट हा सर्व हलक्या, अवजड वाहनासाठी कायमस्वरूपी बंदी घालावी असा अहवाल सादर केला यामुळे चंदगड बांधकाम विभाग याना घाटातील वाहतूक बंद करणे ही भूमिका अन्यायकारक आहे. जर बांधकाम विभाग घाट वाहतूक बंद करण्यासाठी आग्रह करतात हे चुकीचे आहे. अवजड वाहने रोखणे बांधकाम विभाग यांची जबाबदारी पण सर्व सामान्य लोकांच्या बसेस बंद कशासाठी बसेस सुरू झाल्या पाहिजे अशी भूमिका आंदोलन कर्ते यांनी घेतली.
सर्व सामान्य नागरिक विद्यार्थी यांची सोय झाली पाहिजे यासाठी बसेस सुरू होणे आवश्यक आहे. यासाठी आम्हाला हे आंदोलन करावे लागले. असे सांगितले. तिलारी नगर येथे रस्ता रोको आंदोलन मुळे या मार्गावर दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने अडकून पडली. याच दरम्यान दोन पेशंट खाजगी वाहन तसेच एक रुग्णवाहिका याना वाट करून देण्यात आली. जो पर्यंत प्रशासन निर्णय घेत नाही तो पर्यंत उठणार नाही. अशी भूमिका घेतली.
तिलारी नगर येथे रस्ता रोको आंदोलन मुळे वाहतूक ठप्प झाली आहे. हे समजताच चंदगड पोलीस पथक, चंदगड नायब तहसीलदार महिला अधिकारी घटना स्थळी दिड तासाने दाखल झाले. यावेळी आंदोलन कर्ते समवेत चर्चा झाली यावेळी आंदोलन कर्ते यांनी आम्ही लोकांसाठी आंदोलन करत आहे. वैयक्तिक फायद्यासाठी नाही. बांधकाम विभाग जाणूनबुजून अन्याय करत आहे. जर एस टी बस सुरू नाही. तर सर्व वाहन बंद करा अशी मागणी केली. लोकांची गैरसोय होण्यास बांधकाम विभाग जबाबदार आहे असा आरोप केला.
यावेळी नायब तहसीलदार यांनी तिलारी घाटातून बस सुरू बाबत अहवाल तयार झाला आहे. प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तसेच चंदगड तहसीलदार चव्हाण यांची बैठक सुरू आहे. हाच विषय आहे तेव्हा तुम्ही प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे सोबत चर्चा करा असे सांगितले. आणि आंदोलन मागे घ्यायला लावले.
या नंतर दोडामार्ग चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते यांनी गडहिंग्लज प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे तहसीलदार चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आम्ही अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठवला आहे. बसेस सुरू झाल्या पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत पण टेक्निकल बाबी आपल्या हातात नाही तरी आपण जिल्हाधिकारी सोबत चर्चा करून निर्णय झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले. काही करून बस सुरू झाल्या पाहिजे. अवजड वाहने बंदी बाबत बांधकाम विभाग किंवा पोलिसांनी चौकी उभारणी करावी असे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जर जनतेची गैरसोय लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतला पाहिजे. जर सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बसेस दोन दिवसांत सुरू झाल्या नाहीत तर उग्र आंदोलन करावे लागेल याला चंदगड बांधकाम विभाग जबाबदार राहील असा इशारा दिला.
No comments:
Post a Comment