हलकर्णी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध कला प्रकारामध्ये यश - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2024

हलकर्णी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध कला प्रकारामध्ये यश

 


चंदगड / प्रतिनिधी 

         हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारामध्ये यश संपादन केले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न महाविद्यालय नियतकालिक स्पर्धेत महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. रंगचित्र या प्रकारामध्ये अनिकेत सुतार बीए भाग तीन या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक मिळाला तर व्यक्तिचित्र रेखाचित्र या प्रकारात कांचन आंबेकर बीए भाग तीन यांना प्रथम क्रमांक मिळाला तसेच बीकॉम भाग 3 ची विद्यार्थिनी सुनीता पाटील यांना ललितलेखन यामध्ये तृतीय क्रमांक देण्यात आला. 

       यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दरवर्षी यशोदीप या अंकाचे प्रकाशन केले जाते. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी विविध प्रकारच्या कविता कथा चित्रकला आदी कलाविष्कार सादर करत असतात. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षांमध्ये महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांनी यशोदीप अंका मध्ये रंगचित्र व्यक्तिचित्र ललितलेख आदी प्रकारच्या कलेचे सादरीकरण करण्यात आले होते. तसेच नुकत्याच झालेल्या शिवाजी विद्यापीठ आयोजित मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये अनिकेत सुतार यांने रांगोळी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला होता. त्याचबरोबर स्थळ चित्रांमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. 

       दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील यशोदीपचे संपादक डॉ. अनिल गवळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर उपप्राचार्य प्रा. आर. बी. गावडे, माजी प्राचार्य प्रा. पी. ए. पाटील, प्रा. एस. एन. खरूजकर आदी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांची कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment