हलकर्णी महाविद्यालयातर्फे मतदान जनजागृती रॅली - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2024

हलकर्णी महाविद्यालयातर्फे मतदान जनजागृती रॅली

  


चंदगड / प्रतिनिधी

         हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महाविद्यालय ते हलकर्णी गाव पर्यंत मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी या रॅलीचा शुभारंभ केला. 

       मतदानाचे महत्त्व पटवून देणाऱ्या घोषणा यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी दिल्या. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. यु. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले व या रॅली मागचा उद्देश स्पष्ट केला. मतदान करणे व मतदानाचा हक्क बजावणे तसेच कुणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही जनजागृती राहिली काढण्यात आली होती. यावेळी हलकर्णी गावात राहिली पोहोचल्यानंतर महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागामार्फत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले व मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच हलकर्णी गावचे ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. हलकर्णी गावात या रॅलीचा समारोप करण्यात आला.

No comments:

Post a Comment