चंदगड मतदारसंघात ४ उमेदवारांचे ७ अर्ज छाननीमध्ये अवैध - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2024

चंदगड मतदारसंघात ४ उमेदवारांचे ७ अर्ज छाननीमध्ये अवैध

 


चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ४५ अर्ज दाखल केले होते. बुधवारी झालेल्या छाननीत एकूण ७ अर्ज अवैध ठरले असून ३८ अर्ज वैद्य ठरले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट आमदार राजेश पाटील, शरदचंद्र पवार गट डॉ. नंदिनी बाभूळकर, जनसुराज्य शक्ती मानसिंग खोराटे, अपक्ष शिवाजी पाटील गोपाळराव पाटील, अप्पी पाटील या दिग्गजांसह ३८ अर्ज वैध ठरलं. तर माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांचे २, सुष्मिता राजेश पाटील यांचे ३, विलास शंकर नाईक व राजेश रघुनाथ पाटील यांचा प्रत्येकी १ असे एकूण ७ अर्ज अवैध ठरले आहेत.

छाननीमध्ये वैध ठरलेले पक्षाच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज

कुपेकर-बाभुळकर नंदाताई उर्फ नंदिनी (नॅशनेलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार)

राजेश नरसिंगराव पाटील (नॅशनेलिस्ट काँग्रेस पार्टी)

श्रीकांत अर्जुन कांबळे (बहुजन समाज पार्टी)

अर्जुन मारुती दुंडगेकर (वंचित बहुजन आघाडी)

खोराटे मानसिंग गणपती (जन सुराज्य शक्ती) 

परशराम पांडुरंग कुट्रे (संभाजी ब्रिगेड पार्टी)

भाई नारायण रामू वाईगडे (पिजेंन्टस एण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया) 


छाननीमध्ये वैध ठरलेले अपक्षाचे उमेदवारी अर्ज

अप्पी उर्फ विनायक विरगोँडा पाटील, अशोक शंकर आर्दाळकर, अक्षय एकनाथ डवरी, आण्णासाहेब उर्फ श्रीशैल विनायक पाटील, कागले प्रकाश राजाराम, कुपेकर देसाई संग्रामसिंह भाग्येशराव, केदारी यल्लाप्पा पाटिल, खोराटे मनीषा मानसिंग, गोपाळराव मोतीराम पाटील, जावेद गुलाब अंकली, तुलसीदास लक्ष्मण जोशी, नदाफ समीर महंमदइसाक, प्रकाश रामचंद्र रेडेकर, मोहन प्रकाश पाटील, रमेश सटूपा कुट्रे, शिवाजी शट्टुप्पा पाटील, सुस्मीता राजेश पाटील, संतोष आनंदा चौगुले.


No comments:

Post a Comment