चंदगड : सी एल वृत्तसेवा
आठ दिवसांपूर्वी कुदनूर (ता. चंदगड) येथील दुर्गा माता मंदिरात झालेल्या देवीच्या दागिन्यांच्या चोरीचा तपास लागण्यापूर्वीच आज दि. 24 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास येथील सिद्धेश्वर मंदिरात धाडसी चोरीचा प्रकार घडला. याबाबत काडय्या गुरुनाथ हिरेमठ, मुळगाव गोटुर, ता. हुक्केरी, सध्या रा. सिद्धेश्वर मंदिराजवळ कुदनूर यांनी चंदगड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी. आज दि 24 रोजी अज्ञात चोरट्याने सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील मुख्य दरवाजा व गाभाऱ्याचे कुलूप तोडून श्री सिद्धेश्वर च्या डोक्यावरील चांदीचे किरीट, गाभाऱ्यात ठेवलेल्या तीन पितळी घंटा, दोन पितळी समया, पितळी आरती व पितळी धुपारती असा अंदाजे २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एच एस नाईक करत आहेत. संशयित चोरट्यांवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 (6), 331(4), 305 ड प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment